Wednesday, July 22, 2009

परामाणसशास्त्रा संदर्भात माझा स्मिता यांच्या सोबत झालेला वाद


२८ जून

Smita.....

@ सुरज


१. पुन्हा एकदा, बर्ट्रांड रसेल आणि डेविड ह्यूम चे शब्द प्रामाण्य देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय. विज्ञान काही एखादी संस्था नाही कि जिचा शब्द अंतिम असेल, विज्ञान म्हणजे सत्य जे सार्वत्रिक असते आणि सिध्द होऊ शकते. तुम्ही कृपा करून एका श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या टर्म्स समजून घ्या, आतापर्यंतच्या पोस्ट वरून ते तुमच्यासाठी किती अवघड आहे ते दिसतेय, पण प्रयत्न तर करा......!!!


२. चमत्काराचा अर्थ ’भौतीकशास्त्राने प्रस्थापित केलेल्या नियमांच भंग ’ असाच आहे. यात बदल नाही.

हवेतून किंवा विस्तवावरून न भाजता चालणे हे सुद्धा विज्ञानाच्याच नियमात बसते. आणि विज्ञानाचे सर्व नियम हे सर्व माणसांना सारखेच लागू होतात. ते व्यक्तीसापेक्ष नसतात. विज्ञानात नियम तेव्हाच बनतात जेव्हा ते सगळीकडे सारखे लागू होतात.


३. आणि शेवटचे, अतींद्रिय शक्तींचे अस्तित्व सिध्द करून दाखवाच..

२९ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒Smita

तुम्ही म्हणता त्यात काही अंशी तथ्य आहे !
पण मी जे उदाहरण दीलेले आहे ते एका प्रसिद्ध व कट्टर बुद्धीवाद्याचे आहे त्यामूळे असा एक कट्टर बुद्धीवादी असे का बोलला असेल ? तुम्ही म्हणता की सत्य सिध होऊ शकते ! बरोबर आहे !
पण एके काळी पॄथ्वी सपाट होती हे देखील सत्य आहे असे माणन्यात येई !पण आता सत्य काय ते सर्वांना माहीत आहे !
परा मानस शास्त्राचे देखील असेच आहे .... ! आणि रहीला प्रश्न परामाणस शास्त्राचा सिद्धते बद्दल .....
तर पाश्चात्य देशांमध्ये अनेक संशोधक त्यावर संशोधन करत आहेत ....
अनेक संस्था त्यावर काम करत अहेत (उदा. Australia मधील Spiritual Research Foundation )
परामानशशास्त्राचे संशोधन करणारि विद्यापिठे आहेत ...!
काहि दिवस थाम्बा ! परामाणसशास्त्राला सुद्धा "शास्त्र" म्हणुन गौरवन्यात येयील!
तरी ही तुम्हाला शंका असेल तर श्री अकोलकरांचे..."परामानसशात्र" नावाच पुस्तक वाचा !
चमत्काराचा बाबतीत सांगायचे झाले तर मी व टाकलेला पोस्ट पुन्हा वाचा !
त्यात उदाहरण दिले आहे की ...
हवेतुन चालाना-याला जमीनीवर चालणे म्हणजे "’भौतीकशास्त्राने प्रस्थापित केलेल्या नियमांच भंग " वाटेल !
पण वस्तुस्थीती तशी आहे का ?
श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा माझा चांगला अभ्यास आहे !
गरज आहे त्यामधील फरक लक्षात घेण्याची

२९ जून

Smita.....

@ सुरज
१. परामानस शास्त्र हे नवीन उदयाला आलेले शास्त्र नाही. ते कधीपासूनच अस्तित्वात आहे. प्रगत विज्ञान तर सोडाच, साध्या तर्काच्या आधारावर सुद्धा ते टिकत नाही. मुळात ते शास्त्र नाहीच. कारण शास्त्राच्या कसोट्या जसे प्रचीती, सार्वत्रिक प्रचीती यात ते खरे उतरत नाही. तरीही, विज्ञान नम्र असते, उद्या ते सिध्द झाले तर त्याला नक्कीच पाठींबा मिळेल.
२. श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर तुमचा चांगला अभ्यास आहे हे ऐकून आश्चर्य वाटले. आतापर्यंतच्या तुमच्या पोस्ट वरून जाणवले नाही.

३० जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒Smita

अनेक गोष्टी अशा असतात की ज्या तर्काच्या आधारे ख-या ठरत नाहीत
पण त्या ख-या असतात ! परामाणसशत्र हे शास्त्र नाही हे तुम्ही कसे म्हणु
शकता (वास्तवीक तुम्हीसुद्धा या संकल्पनेचा उल्लेख परामाणस’शास्त्र’ असाच केला आहे.) ?
मी मागे सुद्धा म्हटले आहे की या विषयावर संशिधने चालु आहेत !
खरे काय ते लवकरच समोर्त येईल ! पण त्याला अतापासुनच तुम्ही विरोध
करता हे पाहुन मला मध्ययुगातील धर्मातील कक्तेदारी असणारे व
गॅलिलिऒ व कोपर्नीकस यांना विरोध करणारे धर्म्मार्तंड आठवले !
फरक फक्त ईतकाच मध्ययुगिन लोक प्रस्थापीत धर्माच्या नावाखाली
नव्याने उगम होणा-या विज्ञानाला विरोध करीत होते .आता मात्र तुमच्या
सारखे लोक प्रस्थापित विज्ञानाच्या व बुधीवादाच्या करता आहात .
३० जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒॒Smita

काही वेळ थांबा मी काही दिवसांनी श्रधा व अंधश्रद्धा या संकल्पणा
स्पष्ट करणारा लेख टाकणार आहे ! तो वाचल्यावर तुम्हाला
कळेल की मी असे का वागत होतो

३० जून

Smita.....

@ सुरज


वैज्ञानिक दृष्टिकोनाचे घटक असतात, ते म्हणजे निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचीती आणि प्रयोग. परामानस "शास्त्र" यात कुठेच बसत नाही.

वैज्ञानिक दृष्टीकोन सांगतो, जेवढा पुरावा तेवढा विश्वास. परामानस शास्त्रात हवे तेवढे पुरावे उपलब्ध नाहीत.

विज्ञान अंतिम सत्यावर नव्हे तर सत्याच्या सातत्यावर उभे असते. त्याच्या २ महत्वाच्या कसोट्या म्हणजे स्वायत्तता आणि सम्यकता. मला सांगा यात परामानस कुठे बसते? ऑस्ट्रेलिया मध्ये संशोधन सुरु असेल तर त्यांना हार्दिक शुभेच्छा.


आम्ही विज्ञानाचा मक्ता घेतलेला नाही. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे विज्ञान हि काही संस्था नाही. आम्ही फक्त सत्याच्या बाजूने आहोत.


तुमच्या श्रद्धा अंधश्रद्धा लेखाची उत्सुकतेने वाट बघत आहे

३० जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒Smita

आपल्याला आनंदची अशी गोष्ट म्हणाजे आपण वर उल्लेख केलेल्या संकल्पनांच्या
आधारेच ( निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचीती आणि प्रयोग. ) परामाणसशास्त्राचा
अभ्यास चालू आहे . त्यावर अनेक प्रयोग होत आहेत . तर्क वितर्क लढवले जात अहेत
मला फक्त इतकेच विचारायचे आहे की ज्या संकल्पनेचा स्विकार पाश्चात्यानी करुन
त्यावर अभ्यास, प्रयोग सुद्धा सुरु केले आहेत, काही सुद्धांत मांडले आहेत अशा
संकल्पणेला (परामासशास्त्र) आम्ही चार पुस्तके जास्त शिकलेले .., (तिही अर्धवट) काही भारतीय
मात्र थोतांड माणत आहेत ............. हे किती बरोबर आहे ! परामाणसशास्त्रात पुरावे
उपलब्ध नाहीत असे तुम्ही म्हनू शकत नाही (अधीक माहीती साठी पुन्हा एकदा प्रा.व.वी अकोलकरांचे
परामाणसशात्र पुस्तक वाचा ). तुम्ही सत्याच्या बाजुने उभे अहात हे वचुन चांगले वाटले ..
पण तुम्ही सत्य व आसत्य यांत गफलत करत अहात असे वाटते .....काही सत्ये अजुन सिद्ध
झालेली नसतात ........होणार असतात..........होण्याच्या मार्गावर असतात ! पण अशा
गोष्टींना आधिपासुनच "असत्य" म्हणुन जाहीर करणे किती बरोबर ?
३० जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

डॉ.पुहारीक यांचा अतिंद्रिय संशोधनाबाबतचा अनुभव येथे नमुण्यादाखल देत आहे ...
पहा............
अमेरिकेतल्या विश्वविद्यालयीन प्रयोगशाळांमध्ये अद्ययावत् विज्ञान शास्त्राच्या न्याय निष्ठुर पद्धतींचा अवलंब करून अतींद्रिय ज्ञानाची प्रायोगिक मीमांसा सुरू असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले.
अमेरिकेत नॉर्थ करोलायना या प्रांतांमध्ये असलेल्या ‘ड्यूक युनिव्हर्सिटी’मध्ये डॉ. र्‍हाईन या प्रसिद्ध संशोधकाने गेली २५ वर्षे अत्यंत एकाग्रतेने अतींद्रिय ज्ञानाबद्दल सहस्रावधी प्रयोग केले. त्यांच्या पत्नी मिसेस र्‍हाईन, डॉ.प्रॅट व डॉ.ओलिस ही मंडळी डॉ. र्‍हाईन यांना उत्कृष्ट सहकार्य देत आहे. डॉ. र्‍हाईन यांच्या प्रयोग शाळेत चाललेले मूलगामी संशोधन मी स्वत: पाहिलेले असून त्यांच्या संस्थेशी माझे वैचारिक सहकार्य व पत्रव्यवहार या क्षणापर्यंत अखंड चालू आहे.
अमेरिकेतील मेन (Maine) या संस्थानात ग्लेनकोव्ह येथे (रॉकलंड नजीक) ‘राऊंड टेबल फौंडेशन’ या नावाची एक अतींद्रिय संशोधनाची भव्य संस्था आहे. डॉ. पुहारीच हे युगोस्लाव्ह शास्त्रज्ञ संस्थेचे डायरेक्टर आहेत. या संस्थेने मला ६ महिने रिसर्च कन्सलंट (Research Consultant) म्हणून नेमले होते.
तिबेटातील व हिमालयातील काही ठिकाणी सुरू असलेल्या तंत्र पद्धती व मंत्र पद्धती विचारात घेऊन मी या संस्थेच्या प्रयोग शाळेमध्ये सहा महिन्यात अनेक प्रयोग केले.
डॉ.पुहारीच यांचेबरोबर ‘हॅलीकॉप्टर’चे संशोधन आर्थर यंग, हेन्री जेक्सन, कार्ल बेटज हे कार्य करीत होते. डॉ. मेरियन, एलिनॉर बाँड या व्यक्तींचे ठिकाणी काही अतींद्रिय शक्ती प्रगल्भ अवस्थेत प्रकट असलेल्या या संस्थेत मी पाहिल्या. या सिद्धी त्यांनी स्वत: अनेक प्रयोग करून मिळविल्या आहेत. एलिनॉर बाँड यांचे डोळे पूर्णपणे बांधले असतानाही कोणत्याही नकाशावरील स्थळांची नावे त्या वाचू शकतात. डॉ. मेरियन नुसत्या हस्ताक्षराच्या स्पर्शाने ते हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील काही घटना अचूकपणे सांगू शकतात.
३० जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞


[cntd.....]
डॉ.रसेल व त्यांच्या पत्नी लाओ हे दांपत्य अशाच प्रकारचे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या स्वत:चाच एक फाऊंडेशन आहे. ते शिल्पकार व महान शास्त्रज्ञ आहेत.
न्यूयॉर्कपासून ४० मैलांवर स्प्रिंग व्हॅलीमध्ये डॉ.फायफर नावाचे एक जर्मन शास्त्रज्ञ मनाच्या शक्तीबद्दल अनेक अयशस्वी प्रयोग करून राहिले आहेत. ते मुख्यत: रसायन शास्त्रज्ञ आहेत.
आयलीन गॅरेट या विदुषीने परलोक विद्येविषयक अनेक प्रयोग केले असून या विषयांत तिचा फार मोठा अधिकार आहे. इ.स.१९५३ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी अतिमानसशास्त्रज्ञांची एक भव्य जागतिक परिषद भरविली होती. या ग्लेनकोव्ह येथील राऊंड टेबल फौंडेशनमध्ये अनेक वेळा जात येत असतात. या न्यूयॉर्कमध्ये राहतात. यांचे घरीच माझी डॉ.पुहरीच यांच्याशी प्रथम ओळख झाली.
आल्बर्ट आइन स्टाईन व डॉ.मिलिकन हे दोघे आजच्या युगातले अग्रगण्य गणितज्ञ व पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ, अतींद्रिय ज्ञानाच्या शक्यतेबद्दल व प्रायोगिक उपक्रमांच्या आवश्यकतेबद्दल मोठ्या तळमळीने व आस्थेने माझेपाशी बोलले व स्वतंत्र भारतात व शास्त्राची अभूतपूर्व प्रगति झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आलडस् हक्स्ले व जोराल्ड हर्ड हेही अतींद्रिय ज्ञानाचे प्रयोग स्वत: करीत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले.
वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, कोलंबिया व क्रॅलिफोर्निया येथील विश्वविद्यालयात व टोकियो येथील चार विश्वविद्यालयांमध्येही या शास्त्रातील अनेक प्रयोग मोठ्या दक्षतेने केले जात आहेत.
अमेरिकेतील प्रयोग शास्त्रज्ञांनी या विषयात उच्चांक गाठला आहे.
त्यांची वैज्ञानिक पद्धती, नवनवीन उपकरणे व भारतात असलेली या विषयावरील आगाध विचारसामुग्री, ग्रंथ संपत्ती व प्रत्यक्ष अनुभव घेणारे सहस्रावधी साधक या दोहोंचा संगम झाला तर अनेक अतींद्रिय शक्ती व सिद्धी मानवमात्रांस उपलब्ध होतील
३० जून

Smita.....

@ सुरज
बर्याच वर्षांपूर्वी युरी गेलेर नावाचा एक भोंदू होऊन गेला. तो अतींद्रिय शक्तीने चमचे वाकवत असे. त्याची टेप तुम्ही स्वतःच बघू शकता. त्याचा सुद्धा अतींद्रिय शक्तीचा दावा होता. कृपया बघा.
. http://www.youtube.com/watch?v=V1Y7QR314xA.

३० जून

Smita.....

॒सुरज

आणि हे श्री. अकोलकर कोण? कुणी शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर आहेत काय? ते किंवा आणखी कोणी परामानस चा दावा करणारे तयार असतील तर त्यांना तपासू द्यायला काही हरकत नसावी ना?

१ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒Smita

हा विडीऒ काढून टाकला आहे ...!
तरि सुद्ध मि समजु शकतो की तुम्हाला काय म्हणायचे आहे !
असे अणेक लोक आहेत की जे अशा गोष्टींचा फायदा घेवुन स्वत:चा
स्वार्थ साधत आहेत ! अणि त्यामुळेच त्या गोष्टीलाच जाच सहन करावा
लागतो ! यावरुन असे ठरत नाही ही ज्या गोष्टीचा गैरवापर एखाद्याने करुन घेतला
तर ती गोष्टच मुळात असिद्ध होते ! म्हणजे एखाद्या भोंदु बाबाने परामाणस
शास्त्राचा आधार घेवून (गैरवापर करुन) स्वत:चा स्वार्थ साधला असेल. दुस-याला
लुबाडले असेल....! तर तो हरामखोर भोंदूला चलपाने फोडुन काढले पाहीजे
या मताचा मी आहे (कारण अशांच्या मूळे मूळ परामाणसशास्त्र बदनाम होते !)
पण याठीकाणी त्या भोंडुने परामाणसशास्त्राचा आधार घेतला असता
’परामाणसशात्रच खॊटे ’ असे म्हणने कीती बरोबर आहे ? येथे मी आणकी एक उदाहरण देतो ......
लोकशाही राजकारण क्षेत्रामध्ये किती प्रमाणात सध्या भ्रष्टाचार चालू आहे ?
जवळ जवळ सर्वच राजकारणी भ्रष्टाचारात गुंतले आहेत ! असे असताना
आपण लोकशाही राजकारणाला कधीही नावे ठेवत नाही .......! तर भ्रष्टाचार करणा-यांना
नावे ठेवतो ! ................. त्याचप्रमाणे परामाणसशास्त्राचा जरी एखाद्याने गैरवापर करुन
घेतला असता परामाणसशास्त्रालाच नावे ठेवने किती बरोब राहे तुम्हीच विचार करा !
.
प्रा अकोलकर हे परामाणसशास्त्राचे प्रध्यापक आहेत ! त्यांचा विद्वतेची कल्पणा
आपल्याला त्यंचे पुस्तक वाचल्यावरच येईल ! मी तुम्हला वैयक्तीक विनंती करतो
की तुम्ही एकदा तरी त्याचे "परामाणसशास्त्र" हे पुस्तक वाचुन पहा
हे दिसून येते.
१ जुलै

Smita.....

@ सुरज


1. तो video जरी काढलेला असला तरी तुम्ही इंटरनेट वर yuri geller fraud असा सर्च दिला तर उपलब्ध होऊ शकतो. प्रश्न तो नाही, जेव्हा एखादी गोष्ट शास्त्र म्हणून सिद्ध होते तेव्हा ती निरपवाद असते जसे कि theory of relativity or gravity. पण इतक्या वर्षांनंतर सुद्धा शास्त्रज्ञांचे एकमत होऊ शकत नाही आणि ते विज्ञानाच्या कुठल्याच कसोट्या पूर्ण करू शकत नाही तर त्याला शास्त्र कसे समजावे?

2. लोकशाही हि एक प्रणाली आहे, शास्त्र नाही.

3. In contrast, the consensus of the scientific community is that psychic abilities have not been demonstrated to exist. Critics argue that methodological flaws may explain any apparent experimental successes. The status of parapsychology as a science has also been disputed. Many scientists regard the discipline as pseudoscience because parapsychologists continue investigation although no one has demonstrated conclusive evidence of psychic abilities in more than a century of research.

प्रा. अकोल्कारांच्या पुस्तकात यावर काही खुलासा आहे का??
१ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

परामाणसशास्त्राला तुम्ही शास्त्र माणा असे काही आमचा आग्रह नाही
उलट मी तर म्हणेन की जेव्हा परामाणसशात्र हे "शास्त्र" म्हणुन सिद्ध होईल
तेव्हाच यासंबंधी बोला ! तुम्हाला असे वाटत असेल की कोणी तुमच्या
पाठीमागे लागले आहे परामाणसशास्त्राल शास्त्र म्हणलेच पाहीजे असे म्हणत
तर तुमचा तो (स्वत:च्या सोईसाठी करुन घेतलेला गोड) गैरसमज आहे !
मी पुन्हा सांगतो आहे की यावर संशोधने चालू आहेत ! परामाणसशास्त्र हे
शास्त्र म्हणुन सिद्ध झालेले नाही हे मि ही मान्य करतोच ........! पण
गॅलीलिओला व कोपर्निकस ला जसा तत्कालीन धर्माच्या ठेकेदारांनी जसा
आंधळा विरोध केला तसा तुम्ही ही करु नका ..असे मला म्हणायचे आहे !
लोकशाही चे केवळ उदाहरण दिले आहे .!
प्रा. अकोलकरांच्य पुस्तकात याचा खुलासा आहे की नाही ते तुम्ही स्वत:
वाचल्यास अधीक उत्तम
पण सगळेच सामील, त्यामुळे कारवाई काही झाली नाही..
१ जुलै

Smita.....

@ सुरज

तुम्ही म्हटल्याप्रमाणे गॅलीलिओला व कोपर्निकस ला तत्कालीन धर्माच्या ठेकेदारांनी जसा
आंधळा विरोध केला हे अगदी खरे आहे कारण त्यांनी आधी पुरावे दिले आणि नंतर सांगितले. तसे परामानस का करू शकत नाही? जर ते विज्ञानाच्या पद्धती प्रमाणे संशोधन करत असतील तर आतापर्यंत सिद्ध का होऊ शकले नाही


१ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

मी पुन्हा एकदा सांगत आहे की परामानसशास्त्राकडे पुरावे नाहीत
हे तुमचे म्हणने अंधपणाचे(श्रद्धेचे म्हटले तरी चालेल) आहे !
यासाठीच मी तुम्हाला अकोलकरांचे पुस्तक वाचण्याचा सला दिला
होता............असो ! आणि तुम्ही देखिल विज्ञाच्या नावाखाली
परामाणसशास्त्राला आंधळाविरोध करता अहात ! तुम्ही या शास्त्राबद्दल
काही वाचायला तयार नाही काही अभ्यास करायला तयार नाही
नुसते "सिद्ध करा" म्हणुन कासोट्या आवळुन उठले की झाले....!
परामाणसशास्त्र हे आज सिद्ध झाले नसले तरी उद्या होईल ...
काय गडबड आहे का ? प्रयोग चालू आहेत ! शोढ चालू आहे !
फक्त तुम्ही लोक करत असलेला अंध विरोध तेवढा बंद करा

१ जुलै

Smita.....

प्रा. अकोलकर कुठल्या विद्यापीठात शिकवतात? त्यांचा मेल आई डी मिळू शकेल का?
१ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒Smita

बाजारत जा ............... त्यांचे पुस्त्क विकत घ्या ...........
पाने उघडा..................
तुम्हाला हवी असलेली सर्व माहीती मिळेल !॒

२ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

परामानसशास्त्रिय संशोधकांमध्ये वैज्ञानीक दृष्टीकोणाचा आभाव असतो
आणि म्हणुन त्यांची दिशाभुल होऊ शकते सा एक आरोप बुद्धीवाद्यांकडून करण्यात येतो.
हा आरोप एक तर या विषयाच्या अज्ञानातून निर्माण झाला असावा कंवा बुद्धीपुरस्पर
गैरसमज पसरवण्यासाठी करण्यात येत असावा . पहीली गोष्ट म्हणजे अतींद्रिय विषयाचे
संशोधन करण्यासाठी १८८२ साली इंग्लंड मध्ये स्थापन झालेल्या
"ब्रिटीश सोसायटी फॉर सायकलीक रिसर्च"
या संस्थेच्या खुद्द सभासदांनीच आपल्यात अतिंद्रिय शक्ती असल्याचेह सांगणा-या अनेक
माध्यमांची वैज्ञानीक पद्दतीने काटेकोरपणे तपासणी करुन त्यांची बिंगे बाहेर पाडण्याची
मोलाची कामगीरी केली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे या संस्थेने अनेक सभासद व
भूतपुर्व अध्यक्ष हे अंतराष्ट्रीय किर्तीचे नामवंत शास्त्रज्ञ होते. इलेक्ट्रॉनचा शोध लावणारा
जेजे थॉमसन हा या संस्थेचा उपाआध्यक्ष होता. उत्क्राम्तीवादाचा डार्वीन बरोबर सिद्धांत
मांडणारा ए.आर.वॉलेस हा जिवशस्त्रज्ञ या संस्थेचा सन्माण्य सभासद होता.या संस्थेचे
तीन भुतपुर्व अध्यक्ष विज्ञानाचे नोबेल पारितोषीक विजेते होते व दहा अध्यक्ष
एफ़.आर.एस.(फेलॊ ऑफ रॉयर सोसायटी ) होते (हा किताब जगात अत्यंत दुर्लभ माणन्यात येतो )

अतिंद्रिय विषयाचे संशोधन करणा-यांसाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या अध्यक्षा मध्ये अंतराष्ट्रिय किर्तीचे
भौतीकशस्त्रज्ञ माणसशास्त्रज्ञ नितितज्ञ राज्यशास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील मंडळी आढळून येतात.
आईनस्टाईनने अतीद्रीय शक्तीचे अस्तीत्व मान्य केले असुन तिचे साक्षेपी संशोधन
झाले पाहीजे असे आग्रही प्रतीपादन केले आहे (अप्लान सिंक्लेअरच्या "Mental Radio"
या ग्रंथाला आईनस्टाईनने लिहीलेली प्रस्तावना पहा. )
हल्ली रशीसह जगातील
सर्व राष्ट्रात या विषयावर संशोधन करणा-या संस्था स्थापन झाल्या असुन
एकट्या अमेरीकेत ५६ विद्यापिठे, व महाविद्यालये यांनी या विषयाला गुणप्रदान (Credit)
म्हणुन मान्यता दिली आहे.
या सर्व लोकंची दिशाभुल झाली आहे किंवा ते भ्र्माच्च्या
पाठीमागे लागले आहेत, असे म्हणने ही एक तर अज्ञानाची नाही तर ढोंगीपणाची परी सिमा होय

३ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

परामाणसशास्त्राविषयी ते शास्त्रच नव्हे असा अपप्रचार करण्यात येतो
"अमेरिकन असोसिएशन फॉर द एडव्हान्समेंट ऑफ सायन्स" या
अमेरिकेच्या मातब्बर विज्ञान संघाने परामानसशास्त्राला शास्त्र म्हणुन
मान्यता देऊन (पॅरासायकॉलॉजी असोसिएशन ला आपल्या संघाचे सभासदत्व देवून)
हे शास्त्र नव्हे असे म्हणणा-या लोकांना परस्पर उत्तर दिले आहे. परामानसशास्त्रात
प्रयोग करण्यात आले असुन ब-याच अंशी साध्य झाले आहेत. हे पुनरावर्तित
Ganzfeld या नव्या तंत्राने २८ संशोधन संस्थांनी स्वतंत्रपणे प्रस्थापीत केले आहे
. ( पहा.... Research in Parapsychology 1974, 75, आणि ७६ हे
तिन ग्रंथ Ganzfeld हे पास्चिमात्यांचे कृत्रीम ध्यान म्हणता येईल

४ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

@स्मिता
लाखो लोकांना काय वाटते यापेक्षा आपल्याला या वाटते हे महत्वाचे आहे .असे नाही का वाटत तुम्हाला ?
॒लोकायतन
तसे पडताळे करण्याची तसदी आपण नका घेवू . तशी तसदी घेणा-या अनेक
संस्था, विद्यापिठे (एकट्या अमेरीकेत ५६ विद्यापिठे या विषयावर संशोधन
करत आहेत.) अस्तित्वात आह्वेत ! आणि परामानसशास्त्राला शास्त्र म्हणुन
घेण्यासाठी कोणाची ही घाई नाही ! याउअल्ट मी तर म्हणेन की कोणत्याही
निर्णयापर्यंत जाण्यापुर्वी धिर धरा ! जेव्हा परामानसशास्त्र हे "शास्त्र" म्हणुन
मान्यता पावेल तेव्हाच यावर विश्वास ठेवा ! पण ज्याप्रमाणे गॅलिलीओ ला
व कोपर्नीकसल धर्ममार्तंडांनी आंधळा विरोध केला त्याप्रमाणे तुम्ही ही
विज्ञानाच्या नावाने विरोध करु नका ! येवढेच म्हणायचे आहे ! कोणिही
तुम्हाला परामानसशास्त्राला शास्त्र मानाच म्हनुन पाठीमागे लागलेले नाही आहे


४ जुलै

Smita.....

@ ज्वलंत हिंदुत्व

तुम्हाला, मला किंवा लाखो लोकांना के वाटते याच्यापेक्षा सत्य काय आहे हे जास्त महत्वाचे आहे. गलीलियो च्या शोधापुर्वी शेकडो वर्षे लाखो लोकांना असेच वाटत होते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. शेवटी सत्यच जिंकले ना?

उद्या परामाणसशास्त्र हे "शास्त्र" म्हनुन विद्यमान
झाल्यावर त्याचा हिरीरीने पुरस्कार करणारे हेच लोक असणार आहेत
यांचा विरोध क्षणीक आहे ! -- याचे कारण विज्ञान हे सत्याच्या सातत्यावर उभे असते. सिध्ध झाल्यावर त्याला पाठींबा देण्यात चूक काय आहे?
.
६ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒Smita

धन्यवाद स्मिता .....!
आणि शेवटी सत्यच जिंकते हा तुमचा मुद्दा ही बरोबर आहे !
फक्त मला येवढे सांगा की आह परामानसशास्त्र हे "शास्त्र" म्हनुन
सिद्ध झालेले नाही म्हणुन त्याला विरोध करणे बरोबर आहे का ?
.
.

६ जुलै

Smita.....



अगदी बरोबर बोललात आपण.... परामानस हे शास्त्र म्हणून सिध्द होत नाही तोवर त्याला विरोध करणे हे बरोबर आहे...
दर्शवित आहे
६ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

@Smita

म्हणजे परमाणसशास्त्र हे शास्त्र म्हनुन सिद्ध होत नाही तोपर्यंत
आपण याला आंधळा विरोधच करत रहणार अहात का ?
जसा गॅलिलिओला व कोपर्निकसला केला गेला ?
६ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒Smita
तुमचा जर असा समज असेल की परामाणसशास्त्रावर फक्त अमेरीकेत
संशोधन चालले आहे तर तो तुमचा (स्वत:च्या सोईसाठी करुन घेतलेला)
गैरसमज आहे ! जवळ-जवळ जगातिल सर्वच देशांमध्ये या विषयावर
संशोधन चालू आहे !
६ जुलै

Smita.....

गलिलिओ आणि कोपर्निकस यांना झालेला विरोध आंधळा होता कारण त्यांनी आधी त्यांचे संशोधन सिध्द केले आणि मग लोकांना सांगितले. सिद्ध केले म्हणजे सार्वत्रिक सिध्द केले, तुम्ही आम्ही सुद्धा ते तपासून पाहू शकतो.

७ जुलै

Smita.....

गलिलिओ ने जेव्हा दुर्बिणीचा शोध लावला तेव्हा त्याने ती आकाशाकडे रोखली. त्याला असे दिसले कि गुरु ग्रहाला अनेक चंद्र आहेत. गुरुचे चंद्र, शनीच्या कडा आणि इतर गोष्टीचे निरीक्षण केल्यावर त्याला असे लक्षात आले कि बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे चंद्र सूर्य हे देवाने माणसासाठी बनवलेली झुंबरे नसून साधे खगोलीय ग्रह तारे आहेत. तसेच, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सुर्याभोबाती फिरते. तोवर बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व लोक सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असेच मनात होते. हे सत्य सांगितल्याबद्दल त्याला शिक्षा झाली.

त्याने ते नुसतेच सांगितले असे नाही, तर ज्याला ज्याला त्याबद्दल शंका होती त्या प्रत्येकाला ते प्रत्यक्ष दाखवले. याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात जो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया आहे. परामानस यात बसते का??
७ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

अहो ताई किती वेळा सांगायचे तुम्हाला ? पुन्हा सांगतो ..की परामाणसशास्त्र या विषया
वर संशोधन चालू आहे ....! अजुनपर्यंत ते सिद्ध झालेले नाही हे मी मान्य करतो
पण उद्या सिद्ध होऊ शकते ना ..! संशोधन चालू आहे शोध , प्रयोग चालू आहेत
जरा धिराने घ्या ........... काही गडबड आहे का ? फक्त मला ईतके सांगा की
परामाणसशात्र अजुन सिद्ध झाले नाही ....पण ते असाध्य ही नाही...! म्हणजे
खरे म्हणता येत नाही तसेच खोटे ही म्हणता येत नाही ! अशा परिस्थित हे
शास्त्र खरे आहे का खोटे आहे यावर संशोधन चालू असताना तुम्ही लोक
आगोदरच त्याला खोटे ठरवुन मोकळे होता.....हे किती बरोबर आहे ..?
तसेच परामानसशास्त्राला तुम्ही नाकारु शकत नाही कारण या संकल्पनेमध्ये
अशा घटना घडल्या आहेत की जिथे मानवि बुद्धी खुंटते ! अशा प्रकारांबाबत
आपल्याला काय म्हणाय्चे आहे

७ जुलै

Smita.....

परामानस अजुन सिद्ध झाले नाही ....हे तुम्ही मान्य करताय हि खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या मनाचा मोठेपणा यातून दिसून येतो. मग तुम्ही त्यासाठी इतका वाद का घालताय??
आणि कृपया त्यात मानवी बुद्धी खुंटल्याची इथली तपासता येणारी उदाहरणे सांगा.
एक relaxation method एवढी मला योगा बद्दल माहिती आहे. आणि ज्याने तणावमुक्त वाटते it works.
७ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

माझा बोलण्याचा उद्देश्य केवळ ईतकाच आहे की
जर परामानसशास्त्र हे अजुन सिद्ध झाले नाही (पण
असाध्य ही नाही )त्याला विरोध का ?
या विरोधाचे कारण कळेल का ?
७ जुलै

Smita.....


माझा बोलण्याचा उद्देश्य केवळ ईतकाच आहे की
जर परामानसशास्त्र हे अजुन सिद्ध झाले नाही (आणि
साध्य ही नाही ) त्याला इतका पाठींबा का ?
याचे कारण कळेल का ?
७ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

त्याला पाठिंबा असण्याचे कारण म्हणजे लोकांचे या बाबतितील
अनुभव ! स्वत:चे ही या बाबतीतील अनुभव माणवाच्या क्षमतेबाहेर
काम करणारी अशी शक्ती आहे असे मला वाटते !
’भौतीकशास्त्राने प्रस्थापित केलेल्या नियम
मला पटत नाहीत ! म्हणुन समर्थन ! या शास्त्राचा माझा थोडा
अभ्यास आहे .. आजपर्यंत केलेल्या अभ्यासाअंती माझे
मत झाले आहे की ’भौतीकशास्त्राने प्रस्थापित केलेल्या नियमांना
भंग करणा-या एक नाहीत तर अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत
......... म्हणुन समर्थन ! मल तुम्ही सांगा तुम्ही या शास्त्राचा आजपर्यंत
काय अभ्यास केला ? किती या बाबतीतील प्रकरणे अभासली ?
कीती लोकांचे अनुभव अभ्यासलेत ? व यानंतर आपण कोणत्या
निष्कर्शावर पोहोचलात ? परामाणसशास्त्र , अतिंद्रिय विज्ञान गगैरे
संकल्पनांचा जवळुन अभास करा ! तुमचे सारे गैरसमज आपोआप
दूर होतील
७ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

परामणसशात्र हे साध्य नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही
हा तुमचा (काहीही अभ्यास न करता काढलेला) आंधळा
निषकर्श आहे ! थोडक्यात हि तुमची अंधश्र
...
७ जुलै

Smita.....

किती लोकांचे कुठले अनुभव? तुमचे अनुभव प्लीज जरा शेअर करता का? आपण ते तपासू यात. तुमच्या अनेक विषयातील विद्वत्तेचा पूर्ण आदर राखून मला असे म्हणायचे आहे कि आतापर्यंत आम्ही व्यक्तीशः १० दावे तपासले आणि ते सर्व अशास्त्रीय होते. तुमची हरकत नसेल तर तुम्हाला सुद्धा तपासण्याची नम्र इच्छा आहे. तुमचे सुद्धा गैर समाज दूर होतील.

८ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒Smita

धन्यवाद ! काही वेळात मी एक प्रकरण टाकीन येथे
आपण त्यावर चर्चा करू



११ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒स्मिता

याबद्दल आपल्याला काय म्हणायचे अहे ??
.
.
१) http://lh4.ggpht.com/_jcz4C6DCwTw/SlgUpFy7syI/AAAAAAAAACU/0gd3Mu5yekE/s576/tarun_bharat_11__Jun_1990_1.JPG
.
.
२)
http://images.orkut.com/orkut/photos/OgAAACRDVcRBRKkUz16aGRpanBIrMgvEmk3Z0qWsETkNQa6mEAxkf5An5Jk4wo5HDtHFaIAdpvYP_6a4rFxujksePHMAm1T1UA61nG0X5ZOVhUloPIIE-xBls_zg.jpg
.
.
____________________________________________________________________
पहीली बातमी तरूण भारतच्या ११ जून १९९० अंकातील आहे
आणि दुसरी बातमी दै. तरून भारत च्या १० फेब्रूवारी १९८६
च्या अंकात वरी बातमी प्रसिद्ध झाली असुन ती जशीच्या तशी
येथे दिली आहे


१३ जुलै

Smita.....


if those news are so great, why did only Tarun Bharat printed them? why not ALL the papers? anything can be printed in such papers, they are no more than hot stuff to raise the sale.


ani asha ghatna tar ghadatach astil, ata jar kuni tase asel tar sanga mhanje tapasta yeil.

१३ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

इतर पेपर्स् मध्ये बातमी आलेली असेल पण मला
तरुन भारत मधील बातमी मिळाली !
तपायसायच्या गोष्टी जावु द्यात हो ! आधी या बातमी
वर बोलू ना ! मला सांगा दुस-या बातमी मधील
गनेश चूरी याने "वाढवण गावी माझे घर आहे आणि मला
तेथे जायचे आहे" असे का म्हटले ? ते ही तो केवळ सात वर्षाचा
असताना ? याबाबतची वैज्ञानीक उपपत्ती आपण काय व
कशी लावाल ? ही घटणा भौतीक्शास्त्राच्या मर्यादा
भंग करणारी नाही का ?
१३ जुलै

Smita.....

अजिबात नाही. किंबहुना हि घटना मानस शास्त्राच्या कक्षेत येते. आणि तपासायच्या गोष्टी जाऊ द्या कसे म्हणता? तो असे का बोलला हे तपासल्याशिवाय कसे कळेल?

गणेश प्रमाणे अनेक केसेस यापूर्वी व्यवस्थित तपासल्या गेल्या आहेत आणि त्यात सत्याचा अंश देखील मिळाला नाही. मग हि बातमी किंवा गणेश चा दावा खोटा नाही कशावरून??

माणूस मारतो म्हणजे त्याच्या मेंदूतील पेशींचे संपूर्ण विघटन होते. स्मृती मेंदूमध्ये असतात. त्यामुळे पुनर्जन्म विज्ञानाच्या आधारावर टिकतच नाही. तसेच आपल्या थोर भारतीय पूर्वजांनी सुद्धा "भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः??" असे सार्थपणे म्हटले आहे ते कृपया लक्षात घ्यावे.
१३ जुलै
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒स्मिता

बहुतेक आपन मी दिलेली बातमी पुर्ण वाचली नसावी
अथवा वाचूनही काही मुद्द्यांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष
करत अहात ! सत्याचा अंश मिळाला नाही असे म्हणता
पण अशा कही घटना आहेत की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने
सांगितलेली माहीती १००% खरी ठरलेली आहे ! अशा घटनांबाब्त
आपल्याल काय म्हणायचे आहे ? तसेच गणेश चा दावा खोटा
नाही हे या वरुन की गणेश केवळ ७ वर्षाचा मुलगा आहे !
तसेच त्याला वाढवन गावची माहीती कशी माहीती? त्या गावी
जाताच त्याने आई बाबांचा हात सोडून सरळ दळवी यांच्या
घराचा रस्ता कसा काय धरला ? तो भावना या महिलेच्या
छायाचित्रापाशी जावून बरोबर नावाने कसे काय हाका मारु लागला !
त्या भावनाच्या पतिचे (हरिश्चंद्र) नाव ७ वर्षाच्या गणेश ला
कसे माहीत ? ईतकेच नाही तर हर्श्चंद कसा मेला ते गणेश ला
कसे कळले ? तसेच त्याने पुर्वजन्मीच्या नातेवाईकांना
नावाने कसे ओळखले
आता ते पण संदर्भ द्या इथे....
१५ जुलै

Smita.....


गणेशला तुम्ही जाऊन तपासले आहे का? त्याशिवाय फक्त एका पेपरात छापून आलेय म्हणून खरेच कसे म्हणता? तो ९० मध्ये ७ वर्षांचा होता म्हणजे आता चांगला तरुण असेल आणि तपासू द्यायला तयार असेल तर आपण त्याला काही प्रश्न विचारुयात. तुम्ही एवढ्या ठाम पणे म्हणताय म्हणजे तुम्हाला त्याचा पत्ता माहित असेलच
तो बकरी आणि गणेश चुरीचा लेख म्हणताय का तुम्ही? पुरावा आणला का??
१६ जुलै (7 दिवसांपूर्वी)
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

@Smita.....

मी दिलेल्या "तरुण भारत" मधील अवतरणे जर तुम्हाला
पुरावा वाटत नसतील तर माझ्या नाईलाज आहे ! तुम्हाला
प्रकरणे हवित , पुरावे हवेत आणि ते दिले की त्याच्या
खरे पणाबद्दल तुम्हाला संशय येतो . तपासायला जावूया
म्हणता ना तुम्ही मला तुमच्या सारख्या अंनिसच्या लोकांवर
अजिबात विश्वास नाही आहे त्याला कारण म्हणजे कुरुंदवाड
मधील प्रकरण ( हे प्रकरण काय आहे हे विचारू नका ) !
ऐत्यावेळि पळून जाणा-या अंनिसवाल्यांकडुन विश्वासार्हतेची
अपेक्षाच करणे चुक आहे . तुम्ही मी गणेश बद्दल विचारलेल्या
प्रश्नाची उत्तरे देत नाही ( तुम्हाला देता येत नाहीत ) . उलट
यासाठी पळवाट म्हणुन सदर वृत्तपत्रातील अवतरणावरच तुम्ही
अविश्वास दाखवता !
तुमच्या माहितीकरीता सांगतो की हि दोन्ही प्रकरणे तरुन भारतच्या
अंकात तसेच श्री अद्वयानंद गळतगे यांच्या " विज्ञान आणि चमत्कार "
या पुस्तकात आहेत . तरि ही तुम्ही पुरावा मागणार असाल ! तर मी
इतकेच म्हणेल की तुम्ही ही प्रकरणे खोटी आहेत हे सिद्ध करुन दाखवा
मी स्वत: माझे काम सोडून अंनिसच्या कार्यात सामील होतो. तसेच
तरूण भारत व श्री गळतगे यांच्यावर केस टाकतो ! बोला अहात तयार
नेहमी सिद्ध करा सिद्ध करा म्हणुन कासोट्या आवळणा-या अंनिस
वाल्यांच्यावर जेव्हा एखादी गोष्ट सिद्ध करण्याची पाळि येते तेव्हा काय
होते हे चांगले माहीत आहे मला !
आता एक काम करा एक तर मी सांगितले ते सिद्ध करा अथवा मी
वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या
१६ जुलै (7 दिवसांपूर्वी)

Smita.....

अहो जर हि बातमी एवढीच खरी आहे तर फक्त तरुण भारत नेच का छापली? Times of india, the hindu, indian express, लोकसत्ता, सकाळ सारख्या पेपर्स नि का नाही छापली? आणि गणेश चा पत्ता द्या न, मी जाऊन तपासते.

अनेक वर्षांपूर्वी इथल्या पेपर्स ने गणपती दुध पितो अशी बातमी छापली होती. मग गणपती खरेच दुध पितो काय? त्यात तर जाहिराती सुद्धा छापतात ज्यात अवास्तव दावे असतात, ते सर्वच खरे मानता का तुम्ही?

एखादी गोष्ट खरी आहे हे ते मानणाऱ्या व्यक्तीला सिध्द करावे लागते. विज्ञान negation सिध्द करत नसते.
१६ जुलै (7 दिवसांपूर्वी)
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

मला तरुन भारतचे अवतरण मिळाले ही माझी चूक झाली
का ? मला ईतर पेपर्स मधील अवतरन मिलाले नाही त्याला
मी काय करू ? मी वरील प्रकरणे व त्यांचे संदर्भ ही दिले आहेत
आता त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचे आणि किती पडताळायचे
किंवा असेच वा-रावर उडवायचे हा तुमचा प्रश्न आहे ! मी माझे
काम केले आहे आता त्याचे करेपण पडताळने हे तुमचे काम
आहे ! पण हा ......! येवढी खात्री देतो कि या घटना खोटया
ठरल्या तर मी माझे काम सोडुन अंनिसच्या कामात सहभागी
होईन आनि वरील दोन संदर्भंवर केस टाकीन

१७ जुलै (6 दिवसांपूर्वी)

Smita.....

सुरज

तुम्हाला इतर पेपर्स मध्ये ती बातमी मिळाली नाही यात तुमची खरच काही चूक नाही. कारण त्यांनी ती छापलीच नाही. त्यांना खपण्यासाठी असले काहीही करावे लागत नाही. गणपती दुध पितो हि बातमी नव्हती का? त्याबद्दल बोला न काही तरी...!!
१७ जुलै (6 दिवसांपूर्वी)
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒स्मिता
पहिली गोष्ट म्हणजे या बातम्या जवळ जवळ १० वर्षे जुण्या आहेत ..तेव्हा ईतर पेपर्स मध्ये आलेली की
नाही हे कोणि ही ठामपणे सांगू शकत नाही . त्यामुळे ईतर पेपर्स मध्ये ही बातमी आलेलीच नव्हती हा
तुमचा पुर्वग्रह खोटा आहे . आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बातमी खोटी नाही याची जबाबदारी घ्यायला मी
तयार आहे ! खोटे ठरवण्याची जबाबदारी तुमची ! या घटना खोटया ठरल्या तर मी माझे काम सोडुन
अंनिसच्या कामात सहभागी होईन आनि वरील दोन संदर्भंवर केस टाकीन बोला अहात तयार ??
आणि हो.... विषय बदलू नका ! अंनिसची ही जुणि खोड मी चांगली ओळखून आहे !
१७ जुलै (6 दिवसांपूर्वी)

raviraja bodke

Nice Posts
१७ जुलै (6 दिवसांपूर्वी)

Smita.....

सुरज

११ जून १९९० चे times of india and inidan express, लोकसत्ताचे जुने अंक मी पहिले. त्यात ती बातमी नाहीये म्हणजे तो काही माझा पूर्वग्रह नाही, ती सत्य परिस्थिती आहे. आधी म्हटल्याप्रमाणे विज्ञान negation सिध्द करत नाही, त्यामुळे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे ते सिध्द करणे त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे काम असते. तुम्ही कधीच ते सिध्द करू शकत नाही हे तुम्हाला पण माहित आहे.
१७ जुलै (6 दिवसांपूर्वी)
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒स्मिता

एखाद्य पेपरामधील बातमी दुस-या पेपर मध्ये नाही म्हणुन ती खोटी ठरवण्याचा तुमचा कोणता
नियम ?
[re..]
मी वरील प्रकरणे व त्यांचे संदर्भ ही दिले आहेत
आता त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचे आणि किती पडताळायचे
किंवा असेच वा-रावर उडवायचे हा तुमचा प्रश्न आहे ! मी माझे
काम केले आहे आता त्याचे करेपण पडताळने हे तुमचे काम
आहे ! पण हा ......! येवढी खात्री देतो कि या घटना खोटया
ठरल्या तर मी माझे काम सोडुन अंनिसच्या कामात सहभागी
होईन आनि वरील दोन संदर्भंवर केस टाकीन
chi!
१७ जुलै (6 दिवसांपूर्वी)
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

@arun

स्वत:ला काही करायची वेळ आली की ती दुस-यावर ढकलून मोकळे होण्याची तुमची
खोड माहीत आहे मला . बातमी देण्याचे काम मी केलेले आहे त्यासाठी एक नव्हे तर
दोन संदर्भ सुद्धा दिले आहेत ! आता ते पडताळायची जबाबदारी तुमची आहे .

॒Ninad
बहुतेक तुम्ही तो लेख पुर्ण वाचलेला दिसत नाही . तो दिवा कशाच्या सहाययाने जळतो
आहे यासाठी अनेक पाहण्या झालेल्या आहेत . परंतु त्यांना काही सापडले नाही हे कसे
काय ? दुसरी गोष्ट दैनिकांबद्दल तर सदर पेपर्स एका विचारसरणि कडे झुकल्यामुळे
त्यातील बातम्या खोट्या ठरवायचा अजब नियम आहे बुवा तुमचा ! अरे जर मी या
घटनेची जबाबदारी घेतो असे स्पष्ट केले आहे तर तुम्हाला पडताळायला काय हरकत
आहे ? स्वामी विवेकानंदांबद्दल बोलायचे झाले तर ... एक गोष्ट मला सांगा तुला
स्वामी विवेकानंदांचे विचार मान्य आहेत का ? त्यांनाही कालीमातेचा साक्षात्कार
झाला होता असे म्हणतात याबाबत तुला काय म्हणायह्चे आहे ? आणि राहीली
गोष्ट मी या मतावर का ठाम अहे ! तर केवळ एका पेपरातल्या बातमि मुळे कधीही
कोनाचा ही आणि कशावरही विश्वास बसनार नाही ! ते खरेच आहे पण मी या मतावर
का ठाम अहे हे मला ईथे सांगता येनार नाही !
[re..]
मी वरील प्रकरणे व त्यांचे संदर्भ ही दिले आहेत
आता त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचे आणि किती पडताळायचे
किंवा असेच वा-रावर उडवायचे हा तुमचा प्रश्न आहे ! मी माझे
काम केले आहे आता त्याचे करेपण पडताळने हे तुमचे काम
आहे ! पण हा ......! येवढी खात्री देतो कि या घटना खोटया
ठरल्या तर मी माझे काम सोडुन अंनिसच्या कामात सहभागी
होईन आनि वरील दोन संदर्भंवर केस टाकीन
१७ जुलै (6 दिवसांपूर्वी)
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

आणि हो एक सांगायचे विसरून गेलो ज्या दुस-या संदर्भाचा उल्लेख मी
केलेला आहे त्या म्हणजे श्री अद्वयानंद गळतगे यांचे विज्ञान आणि चमत्कार
हे पुस्तक माझ्याकडे ऑनलाईन उपलब्ध आहे कोणाला हवे असल्यास
संपर्क साधा ! म्हणजे जेणेकरुन तुमचा ४००/- खर्च वाचेल नाही का ?
नाहीतर अंनिसवाले म्हणायचे ..सुरजने आम्हाला विनाकारण ४०० रु.
खर्च करायला लावले .........

२० जुलै (3 दिवसांपूर्वी)
हटवा

۞. सुरज . ۞

@Smita....

ते प्राचार्य आहेत ! तुम्हाला त्यांचाबद्दल आणखि माहीती हवी असेल तर तुमचा एमेल ID
द्या मला मी त्यांचे पुस्तक फॉरवर्ड करतो .. ! त्यामध्ये तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती
मिळेल
_________________________________________________________