Wednesday, July 22, 2009

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत माझा निखिल सोबत झालेला वाद


१५ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

’अंनिस’ची चिरफाड

अंधश्रद्धा निर्मुलन समिती अगदी नावापासुनच वादाची, भ्रमाची, बुद्धिभेदाची सुरवात करणरा असा एक प्रकार महाराष्ट्रात काही बुद्धी, निती व आचार भ्रष्ट लोकांनी सध्या चालवला आहे ! हिंदु धर्माच्या पराकोटीच्या द्वेशाने भरलेल्या लोकांचा भरणा असलेली, मुस्लिम व ख्रिस्चन धर्मांना जाणिवपुर्वक ’त्यांच्या अमुल्य सुधारणांपासुन दुर ठेवणारी, "श्रद्धा" या शब्दाची नेमकी व्याख्या माहीत नसलेली, कोणाच्याही वैयाक्तीक श्रद्धेला (हिंदुच्या) "अंधश्रद्धा" म्हणुन हिणवणारी, फक्त हिंदु धर्मातील रुढी-परंपरा नष्ट होण्यासाठी आकाश-पाताळ एक करणारी, मोठ मोठे वैज्ञानीकतेचा आव आनणारे शब्द वापरून स्वत:ला थोर वैज्ञानीक समजणा-या लोकांची, "विज्ञान" ही जणु स्वत:चीच मक्तेदारी असल्याचा आव आनणारी, "’हम’ हम है ! बाकि सब पाणी कम है!" अशा अविर्भावात वावरणारी, एखादा बुवा भेटला तर उद्धटपणे वागणारी, दोन दोन लाखांचे बक्षीस जाहीर करणारी, स्वत:च्याच थोबाडीत मारणारी, केवळ गणेशोत्सवावेळी "प्रदुषणाची" चींता करणारी, स्वत: मंसाहारी असून दुस-यास मांसाहार करण्यास रोखणारी, "ईद" च्या वेळी किलॊभर मुग गिळून गप्प बसणारी, , व प्रसंगी पाय लावुन पळणारी अशी ही समीती
१५ जून

Nikhil

पुर्वग्रहदुषित मतं आणि अपप्रचार!!!
१५ जून

Nikhil

(1) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेवून मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, छताला टांगणे, दोराने किंवा केसांनी बांधणे, त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवाअवयवांवर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन इजा पोहोचविणे, उघडयावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अघोरी कृत्य करणे, तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे.

(2) एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कार करुन त्यापासून आर्थिक प्राप्ती करणे, तसेच अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करुन लोकांना फसवणे, ठकवणे अथवा त्यांच्यावर दहशत बसविणे.

(3) अतिमानूष शक्तीची कृपा मिळविण्यासाठी ज्यामुळे जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे; आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे.

(4) मौल्यवान वस्तू, गुप्त धन, जलस्त्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी भानामती या नावाने कोणतेही अमानुष कृत्य करणे
__________________________________________________

ही तर फक्त चार उदाहरणे दिलेली आहेत. अशी अनेक कृत्ये आपल्याच धर्मात घडतात. मुस्लिम किंवा ख्रिश्चन असो त्यांच्याशी आपल्याला काही देणे घेणे नाहीये. आपला धर्म स्वच्छ असावा हे महत्त्वाचे आहे. दुस-याच्या घाणीकडे बोट दाखवले म्हणजे आपण केलेली घाण लपवता येत नाही

Nikhil

खंडणीच्या मध्ये केलेल्या खुनासाठी खंडणीचे कलम कशाला लावायचे? खुनाचे कलमच लावायचे ना.
गुंडांनी गँगवार सुरु केली, त्यात काही खुन केले तर, अतिरेक्यांनी काही जणांना मारले तर वेगळे कलम आणि कायदे कशाला? खुनाचे कलमच लावायचे ना. मोका किंवा पोटा कायदे कशाला?

असे म्हणण्यासारखे आहे हे...
१६ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

@Nikhil

यासाठी सध्याचे कायदे सक्षम आहेत असे वाटत नाही का तुला ?
तसेच अजुनही "अंधश्रद्धा" या शब्दाची सर्वसमावेषक व्याख्या
अस्तित्वात नाही आहे ! मग निर्मुलन नेमके कशाचे करणार

१६ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

@Nikhil @๑۩۩๑|अनुकूल @रवि पळसवाडीक @अविनाश Avinash


१. उपरोक्‍त विधेयक क्र. ८९ मधील १३ कलमे, त्यांची उप व पोट कलमे यांचा वैज्ञानिकदृष्ट्या काहीच अभ्यास नसल्याचे दिसून येते. जादूटोणा, अघोरी, अमानुष किंवा अतींद्रिय शक्‍ती यांचा अभ्यास करणारी अभ्यास केंद्रे, कार्यशाळा किंवा प्रयोगशाळा सरकारकडे नाहीत, तसेच महाराष्ट्रात कुठल्याही विश्वविद्यालयात या विषयांचा अभ्यास होत नाही.

२. परामानसशास्त्र, फलज्योतिषशास्त्र, आत्मा, आत्म्याचे अस्तित्व, तसेच भूत-पिशाच, जादूटोणा, मंत्र व तंत्र या विषयांचा अभ्यास करणार्‍या संस्था किंवा विश्वविद्यालय सरकारकडे उपलब्ध नाही. त्यामुळे विधेयकात नमूद केल्याप्रमाणे `उपरोक्‍त गोष्टी खोट्या असून त्या जनहितविरोधी आहेत', असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केल्याचे पुरावे सरकारने जनतेला दिलेले नाहीत.

३. आंतरराष्ट्रीय पातळीवर आत्म्याचे अस्तित्व, भूत-पिशाच, पुनर्जन्म या विषयांचा अभ्यास करणार्‍या संस्था व विश्वविद्यालये त्यांमधील संशोधनाचे विषय, त्यांच्या अभ्यासाचे मुद्दे, निष्कर्ष, तसेच यशापयश यांची माहिती प्रसिद्ध करत असतात. अशा संस्थांची, त्यांत काम करणार्‍या शास्त्रज्ञांची माहिती व मते महाराष्ट्र सरकारने कधी अभ्यासली आहेत का ?

४. आधुनिक उत्क्रांतीवादाचा जनक डार्विन याच्या सिद्धांतावरून आजचे शास्त्रज्ञ मानवाच्या उत्पत्तीचा अभ्यास करत आहेत. या संशोधनालाही अजून पूर्ण मान्यता मिळालेली नाही. भारतातील ऋषीमुनींनी मात्र `एकपेशीय जंतूपासून एकूण चौर्‍याएेंशी लक्ष योनींत फिरून आल्यावरच दुर्लभ मनुष्यजन्म मिळतो. साधनाभ्यासाने मनुुष्यास आपण परमेश्वर असल्याची अनुभूती प्राप्‍त होते', असे सांगितले आहे. हे प्रत्यक्षानुभूतीचे सत्य आजही अनेक सिद्धसद्‌गुरु त्यांच्या शिष्यांना सप्रमाण दाखवत असतात. अशा संतांचा व िसिद्ध पुरुषांचा सल्ला हे विधेयक तयार करतांना घेणे आवश्यक होते.

५. सत्यासत्यतेविषयी अप्रमाणित असल्यामुळे, तसेच व्यक्‍ती, समाज व राष्ट्र यांच्या श्रद्धांवर आघात करून त्यांना उद्ध्वस्त करणारे असल्याकारणानेच या विधेयकाला सामान्य जनांबरोबर, जिल्हा परिषदा, पंचायती, महानगरपालिका व नगर परिषदा या सर्वच पातळयांवर विरोध होत आहे
१६ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

@Nikhil @๑۩۩๑|अनुकूल @रवि पळसवाडीक @अविनाश Avinash


`भूते, करणी नाहीतच, तर कायद्याने शिक्षा कशी करणार ? व का ?' `भानामती, करणीबाधा, मंत्र-तंत्र, जादूटोणा अस्तित्वातच नाहीत, असे नास्तिक, अंनिस व सरकारही सांगते. विधेयकात यासाठी तथाकथित अतींद्रिय किंवा अतीमानुष शक्‍ती, असे म्हटलेले आहे. चोरी किंवा खून केला, तर चोरीचा माल वा प्रेत पुरावा म्हणून सादर करावे लागते. खरी नोट असते म्हणून तिच्यावरून नकली नोट सिद्ध होते. एखाद्याने भानामती केली, भूते उठवली, हे कसे सिद्ध होणार ? तक्रारदाराचे म्हणणे जर ग्राह्य धरणार असू, तर `माझ्यावर उद्या भानामती झाली', असे माझे प्रामाणिक मत झाले. तर मग विधेयक मात्र ते खोटे ठरवणार व माझ्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार भानामती दूर करण्यासाठी जे उपाय मी स्वत: वा इतरांकडून करून घेणार, त्यासाठी मात्र माझ्यावर व मला मदत करणार्‍यांवर कायद्याचा बडगा उचलणार ! हा कोठला कायदा व न्याय ?'
१६ जून

Nikhil

वाईट, अनिष्ट, समाजाला काळिला फासणा-या गोष्टी यांचे निर्मुलन करायचंय. अनिंसवाले हे चर्चा करायलाही तयार आहेत. वादग्रस्त मुद्दे असतील तर ते काढु ही शकतात. त्याला सरसकट विरोध करु नये. व्याख्या जरी निश्चित करता आली नाही तरी त्यात कालानुरुप बदल आणि सुधारणा केल्या जाऊ शकतात. भर घातली जाऊ शकते
१६ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

॒Nikhil

हा कायदा होण्याच्या आगोदर ती निष्चित केली गेली पाहीजे असे वाटत नाही
का तुला ! मी नुकतेच टाकलेले मुद्दे पुन्हा वाच !
१६ जून

आनंदवनभुवनी

सुरज महाजन नरेंद्र दभोळकरवरचे पुस्तके वाचण्यापेक्षा अभ्यासाची पुस्तके वाचा
मित्रत्वाचा सल्ला
१६ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

>>अनिंसवाले हे चर्चा करायलाही तयार आहेत.<<
.
.

अशीच चर्चा प्रसिद्ध ज्योतिर्विद श्री शहा व त्यांचे उच्चविद्या विभुषीत साथिदार
यांच्याशी झाली होती ! त्यामध्ये अंनिस वाल्यांचे वर्तन हे हुकुमशाहीचे होते
याचे समग्र वर्णन ग.ना. कोपरकर यांनी आपल्या "विद्न्यान सिद्ध वैदीक धर्म"
या पुस्तकात केले आहे ! ते तु कधीतरी वाच म्हणजे अंनिस वाल्यांबरोबर केली
\जाणारी चर्चा कीती निष्फळ असते हे कळेल !
१६ जून

Nikhil

suraj

अरे आधी तुझ्यावर भानामती झाली आहे ते सिद्ध तर करावे लागेल. भानामती काय असते तुला माहित आहे का? मला नाही माहित. तुझ्या पोटात दुखायला लागले की तु स्वत: डाँक्टर बनतोस का? पोट दुखण्यावरुन स्टमक कँन्सर झालाय असे निदान काढशील का? हास्यास्पद आहे.
१६ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

तेचतर म्हणतो आहे मी
जर भानामती केली हे सिद्ध होऊ शकत नसेल
तर भानामती करणा-याला शिक्षा कशी काय करणार ?
१६ जून

Nikhil

अरे बाबा, उगाच कोण कशाला शिक्षा करेल? भानामती मध्ये एखाद्याला फसवले, त्याचे नुकसान केले, जीवे मारले, त्रास दिला, छळ केला तर कारवाई होईल. तक्रारदाराने तक्रारीत असा उल्लेख केल्यावरच कायदा वापरला जाईल ना.
१६ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

मग याला सध्याचे कायदे सक्षम आहेत !

१६ जून

Nikhil

नाहीयेत.
जर हे कायदे सक्षम आहेत तर पोटा, मोका यासारखे कायदे करायची मागणी करु नये. समान नागरी कायदा पण मागू नये. म्हणशील का असे?
१६ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

अंधश्रद्धा रोखण्यासाठी विद्यमान कायदे सक्षम ! - झी २४ तास वृत्तवाहिनीवरील चर्चेचा निष्कर्ष

.
.

मुंबई, २० ऑगस्ट (वार्ता.) - गेल्या काही दिवसांत समाजातील अंधश्रद्धेचा प्रत्यय देणार्‍या काही घटना घडल्या; मात्र त्या रोखण्यासाठी विद्यमान कायदे सक्षम आहेत व अशा घटनांमध्ये पोलिसांनी संबंधितांवर कारवाईही केली आहे, असा निष्कर्ष `झी २४ तास' या वृत्तवाहिनीवर सोमवारी रात्री साडेनऊ वाजता झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमात काढण्यात आला. शिवसेनेचे आमदार श्री. दिवाकर रावते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हे या चर्चेत सहभागी झाले होते.

चर्चेच्या सुरुवातीला गेल्या काही दिवसांत अंधश्रद्धेमुळे घडलेल्या घटनांची माहिती सांगण्यात आली. या वेळी डॉ. दाभोलकर स्वत:ची बाजू मांडतांना म्हणाले, ``शिक्षण, विज्ञान व प्रसिद्धीमाध्यमे हे अंधश्रद्धा निर्मूलनात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म असे काही नाही. या कायद्याच्या नावात जादूटोणा असा शब्द आहे.'' यावर श्री. दिवाकर रावते यांनी विविध उदाहरणे देऊन या कायद्यामुळे हिंदूंच्या धार्मिक बाबी व धर्मग्रंथ यांवर कशी गदा येऊ शकते, हे स्पष्ट केले. ते म्हणाले, ``या कायद्यातील काही कलमांना आमचा विरोध आहे. ती कलमे काढून टाकावीत. हा कायदा केवळ हिंदु धर्मियांसाठी होणार असेल, तर ते आम्हाला मान्य नाही.'' श्री. रावते यांनी हा कायदा केवळ हिंदु धर्मियांनाच कसा लागू होणार आहे, याची उदाहरणे या वेळी दिली. श्री. रमेश शिंदे या प्रसंगी म्हणाले, ``या विधेयकानेच प्रश्‍न सुटेल, हीसुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. झी वाहिनीने स्वत: बंगाली बाबांच्या घटना उघड केल्या आहेत. बीड येथील घटनेतही पोलिसांनी कारवाई केली आहे.''
१६ जून
हटवा

अदृश्य ۞. सुरज . ۞

[conted..]
हा कायदा व्हावाच, अशी भूमिका घेणारे डॉ. दाभोलकर म्हणाले, ``सरकारची इच्छाशक्‍ती असेल, तर हा कायदा निश्चित होऊ शकतो.'' त्यावर श्री. रावते म्हणाले, ``सरकारने हिंमत असेल, तर जरूर कायदा करावा; मात्र त्याचे शारीरिक, मानसिक व आर्थिक परिणाम होतील.'' अखेरीस ``अंधश्रद्धांमुळे घडणार्‍या घटनांवर उपाययोजना काय ?'', असे निवेदकाने विचारल्यावर श्री. शिंदे म्हणाले, ``लोकशिक्षण व धर्मशिक्षण हाच यावरील उपाय आहे. हिंदु जनजागृती समिती विविध माध्यमांतून धर्मशिक्षण देऊन याबाबत जनजागृती करत आहे

No comments:

Post a Comment