Tuesday, August 20, 2013

परामानसशास्त्र

पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे सत्य बोलून दाकवल्याबद्दल गलीलीओचा प्रस्थापितांनी अनन्वित छळ केला. ब्रूनोला वधस्थंभावर जिवंत जाळले. परामानसशास्त्रज्ञांवर निदान ही वागनूक मिळत नाही हे त्यांचे नशीबच समजावे. वस्तुत: गलीलीओ व ब्रूनो यांनी हल्ली परामाणसशास्त्रज्ञ जे करीत आहेत त्याहुन काहीव वेगळे केले नव्हते . त्यांनी सुद्धा या परामाणसशास्त्रज्ञाप्रमाणेच प्रस्थापितांना मान्य नसलेले पण खरे असलेले पुराव्यंसह जगापुढे मांडले. पण यबद्दल त्यांना जी वागणूक मिळाली. तिच्या पाठीमागची मनोवृत्ती समजून घेतली, तर हल्ली अतिंद्रिय शक्तीच्या अस्तीत्वाला विरोध करणा-यांची मन:स्थीती समजेल. फरक फक्त ईतकाच मध्ययुगिन लोक प्रस्थापीत धर्माच्या नावाखाली नव्याने उगम होणा-या विज्ञानाला विरोध करीत होते . हल्लीचे लोक प्रस्थापित विज्ञानाच्या व बुधीवादाच्या नावाकाली नव्याने उदयास होना-य परामासशास्त्राला विरोध करत आहेत. थोडक्यात हा सुद्धा पुर्विप्रमाणेच एक अंधश्रद्धेविरुद्धचा लढा अहे (अर्थात बुद्धीवादाच्या नावाखाली वावरणा-या नव्या अंधश्रद्धेविरुद्धचा लढा !)

काही लोक विज्ञानाला स्वत:ची मक्तेदारी समजतात !
आपणच काय तो विज्ञानाचा मक्ता घेतलेला अहे असे यांना वाटते ! खरे विज्ञान कधिच
सत्याला विरोध करत नाही पण विज्ञानाचा मक्ता घेतलेले पुढे उदयास येणा-या सत्याला
आगोदरच असत्य ठरवुन टाकतात ’या प्रणालीमध्ये पुढे सिद्ध होणारी तत्वे देखिल 
विज्ञानच असनार आहेत हे तुमचे म्हणने १००% बरोबर आहे ! विज्ञान कोणत्याही
गोष्टीला विरोध करत नाही हे ही बरोबर ..........पण जे स्वत:ला विज्ञानाचे मक्तेदार
समजतात ते अगदी बेंबीच्या देठापासुन विरोध करतात ! आणि उद्या सिद्ध होणारे सत्य
कोणी ही आतापासुनच माणा असे म्हणत नाही कोणि कोणावर सक्ती केलेली नाही
..की परामाणसशास्त्र तुम्ही माणलेच पाहीजे म्हणुन ...! मध्य युगाचे दाखले विज्ञानाला
गैरलागु आहेत .....पण सध्या विज्ञानाचा मक्ता घेतलेले लोक व मध्ययुगात धर्माचा मक्ता
घेतलेले लोक यांच्या विचारांचा येथे उल्लेख केला आहे .... ! आणी कोणि ही उठुन परामाणसशास्त्राचा
दावा करत नाही आहे ! हा दावा करनारे अनेक शास्त्रज्ञ आहेत.. ! संस्था आहेत .. ! विद्यापिठे आहेत
परामाणसशास्त्राचा अभ्यास सध्या पाश्चात्य देशांमध्ये मोठ्याप्रमाणात चालू आहे ! 
(अधीक माहीतीसाठी प्रा, व.वी. अकोलकरांचे ---"परामाणसशास्त्र"...पुस्तक पहा)

डॉ.पुहारीक यांचा अतिंद्रिय संशोधनाबाबतचा अनुभव येथे नमुण्यादाखल देत आहे ...
अमेरिकेतल्या विश्वविद्यालयीन प्रयोगशाळांमध्ये अद्ययावत् विज्ञान शास्त्राच्या न्याय निष्ठुर पद्धतींचा अवलंब करून अतींद्रिय ज्ञानाची प्रायोगिक मीमांसा सुरू असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले.
अमेरिकेत नॉर्थ करोलायना या प्रांतांमध्ये असलेल्या ‘ड्यूक युनिव्हर्सिटी’मध्ये डॉ. र्‍हाईन या प्रसिद्ध संशोधकाने गेली २५ वर्षे अत्यंत एकाग्रतेने अतींद्रिय ज्ञानाबद्दल सहस्रावधी प्रयोग केले. त्यांच्या पत्नी मिसेस र्‍हाईन, डॉ.प्रॅट व डॉ.ओलिस ही मंडळी डॉ. र्‍हाईन यांना उत्कृष्ट सहकार्य देत आहे. डॉ. र्‍हाईन यांच्या प्रयोग शाळेत चाललेले मूलगामी संशोधन मी स्वत: पाहिलेले असून त्यांच्या संस्थेशी माझे वैचारिक सहकार्य व पत्रव्यवहार या क्षणापर्यंत अखंड चालू आहे.
अमेरिकेतील मेन (Maine) या संस्थानात ग्लेनकोव्ह येथे (रॉकलंड नजीक) ‘राऊंड टेबल फौंडेशन’ या नावाची एक अतींद्रिय संशोधनाची भव्य संस्था आहे. डॉ. पुहारीच हे युगोस्लाव्ह शास्त्रज्ञ संस्थेचे डायरेक्टर आहेत. या संस्थेने मला ६ महिने रिसर्च कन्सलंट (Research Consultant) म्हणून नेमले होते.
तिबेटातील व हिमालयातील काही ठिकाणी सुरू असलेल्या तंत्र पद्धती व मंत्र पद्धती विचारात घेऊन मी या संस्थेच्या प्रयोग शाळेमध्ये सहा महिन्यात अनेक प्रयोग केले.
डॉ.पुहारीच यांचेबरोबर ‘हॅलीकॉप्टर’चे संशोधन आर्थर यंग, हेन्री जेक्सन, कार्ल बेटज हे कार्य करीत होते. डॉ. मेरियन, एलिनॉर बाँड या व्यक्तींचे ठिकाणी काही अतींद्रिय शक्ती प्रगल्भ अवस्थेत प्रकट असलेल्या या संस्थेत मी पाहिल्या. या सिद्धी त्यांनी स्वत: अनेक प्रयोग करून मिळविल्या आहेत. एलिनॉर बाँड यांचे डोळे पूर्णपणे बांधले असतानाही कोणत्याही नकाशावरील स्थळांची नावे त्या वाचू शकतात. डॉ. मेरियन नुसत्या हस्ताक्षराच्या स्पर्शाने ते हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील काही घटना अचूकपणे सांगू शकतात.

डॉ.रसेल व त्यांच्या पत्नी लाओ हे दांपत्य अशाच प्रकारचे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या स्वत:चाच एक फाऊंडेशन आहे. ते शिल्पकार व महान शास्त्रज्ञ आहेत.
न्यूयॉर्कपासून ४० मैलांवर स्प्रिंग व्हॅलीमध्ये डॉ.फायफर नावाचे एक जर्मन शास्त्रज्ञ मनाच्या शक्तीबद्दल अनेक अयशस्वी प्रयोग करून राहिले आहेत. ते मुख्यत: रसायन शास्त्रज्ञ आहेत.
आयलीन गॅरेट या विदुषीने परलोक विद्येविषयक अनेक प्रयोग केले असून या विषयांत तिचा फार मोठा अधिकार आहे. इ.स.१९५३ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी अतिमानसशास्त्रज्ञांची एक भव्य जागतिक परिषद भरविली होती. या ग्लेनकोव्ह येथील राऊंड टेबल फौंडेशनमध्ये अनेक वेळा जात येत असतात. या न्यूयॉर्कमध्ये राहतात. यांचे घरीच माझी डॉ.पुहरीच यांच्याशी प्रथम ओळख झाली.
आल्बर्ट आइन स्टाईन व डॉ.मिलिकन हे दोघे आजच्या युगातले अग्रगण्य गणितज्ञ व पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ, अतींद्रिय ज्ञानाच्या शक्यतेबद्दल व प्रायोगिक उपक्रमांच्या आवश्यकतेबद्दल मोठ्या तळमळीने व आस्थेने माझेपाशी बोलले व स्वतंत्र भारतात व शास्त्राची अभूतपूर्व प्रगति झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आलडस् हक्स्ले व जोराल्ड हर्ड हेही अतींद्रिय ज्ञानाचे प्रयोग स्वत: करीत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले.
वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, कोलंबिया व क्रॅलिफोर्निया येथील विश्वविद्यालयात व टोकियो येथील चार विश्वविद्यालयांमध्येही या शास्त्रातील अनेक प्रयोग मोठ्या दक्षतेने केले जात आहेत.
अमेरिकेतील प्रयोग शास्त्रज्ञांनी या विषयात उच्चांक गाठला आहे.
त्यांची वैज्ञानिक पद्धती, नवनवीन उपकरणे व भारतात असलेली या विषयावरील आगाध विचारसामुग्री, ग्रंथ संपत्ती व प्रत्यक्ष अनुभव घेणारे सहस्रावधी साधक या दोहोंचा संगम झाला तर अनेक अतींद्रिय शक्ती व सिद्धी मानवमात्रांस उपलब्ध होतील

परामानसशास्त्रिय संशोधकांमध्ये वैज्ञानीक दृष्टीकोणाचा आभाव असतो
आणि म्हणुन त्यांची दिशाभुल होऊ शकते सा एक आरोप बुद्धीवाद्यांकडून करण्यात येतो.
हा आरोप एक तर या विषयाच्या अज्ञानातून निर्माण झाला असावा कंवा बुद्धीपुरस्पर
गैरसमज पसरवण्यासाठी करण्यात येत असावा . पहीली गोष्ट म्हणजे अतींद्रिय विषयाचे
संशोधन करण्यासाठी १८८२ साली इंग्लंड मध्ये स्थापन झालेल्या
"ब्रिटीश सोसायटी फॉर सायकलीक रिसर्च" 
या संस्थेच्या खुद्द सभासदांनीच आपल्यात अतिंद्रिय शक्ती असल्याचेह सांगणा-या अनेक
माध्यमांची वैज्ञानीक पद्दतीने काटेकोरपणे तपासणी करुन त्यांची बिंगे बाहेर पाडण्याची
मोलाची कामगीरी केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या संस्थेने अनेक सभासद व
भूतपुर्व अध्यक्ष हे अंतराष्ट्रीय किर्तीचे नामवंत शास्त्रज्ञ होते. इलेक्ट्रॉनचा शोध लावणारा
जेजे थॉमसन हा या संस्थेचा उपाआध्यक्ष होता. उत्क्राम्तीवादाचा डार्वीन बरोबर सिद्धांत
मांडणारा ए.आर.वॉलेस हा जिवशस्त्रज्ञ या संस्थेचा सन्माण्य सभासद होता.या संस्थेचे 
तीन भुतपुर्व अध्यक्ष विज्ञानाचे नोबेल पारितोषीक विजेते होते व दहा अध्यक्ष 
एफ़.आर.एस.(फेलॊ ऑफ रॉयर सोसायटी ) होते (हा किताब जगात अत्यंत दुर्लभ माणन्यात येतो ) 
अतिंद्रिय विषयाचे संशोधन करणा-यांसाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या अध्यक्षा मध्ये अंतराष्ट्रिय किर्तीचे 
भौतीकशस्त्रज्ञ माणसशास्त्रज्ञ नितितज्ञ राज्यशास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील मंडळी आढळून येतात.
आईनस्टाईनने अतीद्रीय शक्तीचे अस्तीत्व मान्य केले असुन तिचे साक्षेपी संशोधन 
झाले पाहीजे असे आग्रही प्रतीपादन केले आहे (अप्लान सिंक्लेअरच्या "Mental Radio"
या ग्रंथाला आईनस्टाईनने लिहीलेली प्रस्तावना पहा. ) हल्ली रशीसह जगातील 
सर्व राष्ट्रात या विषयावर संशोधन करणा-या संस्था स्थापन झाल्या असुन 
एकट्या अमेरीकेत ५६ विद्यापिठे, व महाविद्यालये यांनी या विषयाला गुणप्रदान (Credit)
म्हणुन मान्यता दिली आहे. या सर्व लोकंची दिशाभुल झाली आहे किंवा ते भ्र्माच्च्या 
पाठीमागे लागले आहेत, असे म्हणने ही एक तर अज्ञानाची नाही तर ढोंगीपणाची परी सिमा होय

No comments:

Post a Comment