Tuesday, August 20, 2013

ढोंगी अंनिस

सर्व-धर्म-समभाव : सामाण्यपने समिती मधिल बहूतेक मंडळी सर्व-धर्म-समभाव वादी आहेत . सर्व धर्माना समान वागणुक मिळावी, दोन धर्मांमध्ये समानता असवी, अशाप्रकारच्या काहीशा विचाराची आहेत. चांगली गोष्ट आहे ! परंतु वाचकहो ! सावधान ...! यांचा सर्व-धर्म-समभाव ही काही प्रमाणा पुरताच आहे. काही प्रमाणानंतर यांच्या समभावाच्य पुढून मांजर आडवे जाते ! समजिक सुधारणेच्या क्षेत्रात काम करणा-या या समाजसुधारकांच्या सुधारणा मुस्लिम व ख्रिस्चन धर्मांना लागू होत नाहीत का ? या सर्व-धर्म-समभाववादी सुधारकांचा ’सर्व-धर्म-समभाव’ सामाजिक सुधारणेच्या बाबतीत लागु होत नाही का ?

स्त्रियांना निषिद्ध असलेल्या मंदीरांमध्ये हे लोक स्त्रियांना प्रवेश देण्यासाठी नेहमी आसुसलेले असतात. यामुळे स्त्रियांचा प्रश्न किती सुटतात हा संशोधनाचाच प्र्श्न आहे. याठीकणी प्रश्न पडतो स्त्रियांसाठी मंदिर प्रवेशा साठी आंदोलन करणा-यांना नेमके काय साध्य करायचे आहे ? स्त्रियांचा आपल्याला फार कळवळा असे दाखवणा-रा समिती वाल्यांनी स्त्रियांचे स्त्री-भ्रूण हत्या प्रतिबंध, घरगुती हिंसाचार प्रतिबंध, हुंडा प्रतिबंध इत्यादींसाठी काय प्रयत्न केले ?? वस्तुत: स्त्रियांना आज ज्याची महत्वाची गरज आहे त्याच्या कडे दुर्लक्ष करुन मंदिर प्रवेशा सारखे प्रकार करुण समितिवाल्यांना काय सध्य आहे ? वरील प्रश्नांपेक्षा "स्त्रियांना मंदिरात प्रवेष मिळत नाही" हा मुद्द महत्वाचा आहे का ? आणी समजा समितिवाल्यानी आंदोलने करुण स्त्रियांना एखदे मंदीर प्रवेशा साठी खुले करुन दिले असे (वस्तुस्थिति बाजुला ठेवुन) गृहीत धरु , मग पुढे काय ? स्त्रियांच्या किती समस्या यामुळे सुटल्या ?? किती हुंडाबळी टळले ? किती घरगुती छळ कमी झाला ? परीणाम काय ??

आणखी एक सांगायचा मुद्द म्हणजे हिंदु धर्मात जितक्या प्रमाणात स्त्रियांना निशिद्ध असणारी मंदीरे आहेत त्याच्या पेक्षा अनेक पटीने अधिक प्रमाणात मुस्लिम धर्मात मस्जिदी, मदरसे, पिरालये आहेत ! तेव्हा अंनिसवाले अशा ठिकनी आंदोलन करायला गेले असे कोठेच ऐकायला अथवा वाचायला मिळत नाही ! हा अंनिस वाल्यांचा दुटप्पीपणाच नव्हे काय ? समिति वाल्यांचा समभाव याठिकाणी का लागु होत नाही ? मुस्लिम धर्मा मध्ये स्त्रियांना बुरखा घालण्याची प्रथा आहे . याविरुद्ध समितिवाले का आंदोलने करीत नाहीत एखाद्या मस्जिदीपुढे ?? कारण साफ आहे असे काहितरी केले म्हणजे मुसलमानां कडुन चांगलाच प्रसाद मिळेल हे यांना चांगलेच माहीत आहे ! त्यामुळे यांचा सर्व-धर्म-समभाव व सामाजिक सुधारणेची संकल्पणा किती योग्य आहे हे सांगण्याची गरज अजिबात नाही ! कोल्हापुर येथे काही महिण्यांपुर्वी ’विश्वशांती महायज्ञ’ आयोजीत केला होता वस्तुत: यात वाईट असे काहीच नव्हते परंतु हिंदु धर्मावर टिका करण्याची एक ही संधी न सोडना-या अंनिस वाल्याना जणू आपली विद्वत्ता(?) दखवण्याची पर्वणीच चालुन आलई आहे अशा अविर्भावात या लोकांनी या यज्ञाच्या नावाने आरडा-ओरड करायला चालु केला.(यांच्या विरोधाची दखल कोल्हापुरातील रस्त्यावरील प्रण्यानेही घेतली नाही ती गोष्ट वेगळी) ! कोल्हपुरात या विद्रोही, अंनिस, ’नविन’धर्म वाले एकत्र आले व कोपरसभा, जन-जागृतीसभा, प्रचारसभा, अशा यांच्या सभा व बैठकींना अगदी ऊत आला

यज्ञसंस्कृती ही बहुजनांची संस्कृती नव्हे , आपली संस्कृती व ब्रम्हणांची संस्कृती वेग-वेगळी आहे अशाप्रकारच्या भाषनांना ऊधान आले. परंतु याच काळा मध्ये या लोकांची ढोंगी "शिव-भक्ती" (इतर वेळी हे लोक स्वत:ल शिवाजी राजांचे खरे अनुयायी म्हणुन सांगत असतात) चव्हाट्यावर आणनारा प्रकार कोल्हापुरात घडला. कोल्हपुरातील मध्यवर्ती बस स्थानका जवळील एका खाजगी ट्रव्हल्स एजन्सी च्या कार्यालयामध्ये एका मुसलमाणाने घुसुन त्या कार्यालयात असलेली शिवाजी महाराजांची मुर्ती अक्षरश: उचलून फोडुन दिली ! जमलेल्या कोणाही व्यक्तीने त्याला हा प्रकार करण्यापासुन रोखले नाही ! इतके करून तो हरामी थांबला नाही तर तो भर रस्त्यावर चक्क नमाज पडु लागला ! झालेल्या प्रकाराने कोल्हापुरातील हिंदुत्ववादी लोकांनी झालेल्या प्रकाराचा निषेध केला ! व पोलीसांचा तो मुसलमाण माथेफिरू आहे अशा स्पष्टीकरणाचे खंडन करण्यात आले ! परंतु आमचे अंनिस, विद्रोही, व नविन धर्मवाली मंडली ??? आश्चर्य म्हणजे यज्ञा च्या नावने ओरडणा-या, कोपरसभा , गल्लिसभा घेणा-यांनी झालेल्या घटनेचा एका शब्दने सुद्धा धिक्कार केला नाही !!

म्हणजे झालेल्या प्रकाराचे आणि या अनिस व विद्रोही मंडळींचे काहिही देणे-घेणे नाही असे म्हणायचे आहे का ? का शिवाजी महाराजांची मुर्ति फोडणारा "मुसलमाण" होता म्हणून या लोकांची दातखिळी बसली ??? आहे का उत्तर ? विश्वशांती महायज्ञ हा झालेल्या प्रकारापेक्षा जास्त भयाणक आहे ? हा यांचा कसला सर्व-धर्म-समभाव ?? झलेल्या प्रकाराबद्दल या लोकांना काय बोलायचे आहे ? शिवरायांच्या पेक्षा "मुसलमानांचे बंधुत्व" या लोकांना महत्वाचे वाटते का ? मला वाटते या लोकंचा ढोंगी "सर्वधर्मसमभाव" उघडा पाडायला इतके मुद्दे पुरेसे आहेत !

No comments:

Post a Comment